अजब दुनिया ही गजब न्यारी
अजब दुनिया ही गजब न्यारी
जखमेवरती फुंकर मारूनी
का चिघळले तू मानवा
दुःख बघुनी सुखाच्या मागे
का लागलास तु मानवा
असा कसा तू हा खेळ मांडला
जगण्यासाठी लागतील अन्नाचे दोन कण
जास्त हाव का ठेवलीस तु मानवा
आपल्याच माणसाचा घाव करूनी
आनंदावर कसा तू विजय मिळवला
हे मानवा गरिबाला नाही घर
नाही खायला अन्न का जवळी
हिसकावून घेतले त्यांचे सुख
असा कसा सुखी राहून सर्वांसाठी
आनंदी राहतोस हे मानवा
