STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

ऐतिहासिक

ऐतिहासिक

1 min
434

ऐतिहासिक गोष्टींचा

पगडा आपल्यावर असता

उगाच आपण खूप खातो

जीवन जगता खूप खस्ता


इतिहासाची पाने चाळता

पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे कळते

तेव्हा आपोआप मग आपले

इतिहासाकडे मन वळते


इतिहास काय सांगतो

इतिहासाने काय पाहिले

इतिहासाने काय अनुभवले

इतिहासाने काय दिले

यापेक्षा आपण 

इतिहासातून काय शिकलो

आपण काय घेतले

आपण काय आत्मसात केले

आपण काय आचरणात आणले

याची खरी जाण असणे

हीच खरी या

ऐतिहासिक अभ्यासाची परिणती आहे

इतिहासाची प्रगतीसाठी

खरी शिकवण आहे


ऐतिहासिक ऐतिहासिक

म्हणत बसण्यापेक्षा

इतिहास घडवत जीवन जगावे

रोज नित्य नवे एक पाऊल 

इतिहास घडविण्यापुढे टाकावे..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational