STORYMIRROR

manisha samnerkar

Romance

3  

manisha samnerkar

Romance

ऐक सखे

ऐक सखे

1 min
370

ऐक सखे नकोस रुसू

 वरखाली होई हा जीव

 बोल तरी माझ्याशी

 न येई का तुज कीव


मन माझ होई बैचन

सांगू मी तुज कसं

लक्ष न लागे कुठं

नजरेचा कटाक्ष दे असं


चल जाऊ फिरायला

राणीचा बाग पाहू

चौपाटीवर भेळ खाऊ

किनारी रमत राहू


लावण्याची तू खाण

संसारी माझ्या आलीस नार

 बैचन करतो हा अबोला

नकोस करु ह्लयास वार


 सोड ना ग हा रुसवा

झाला की,लटका राग पुरे

खाऊ घालतो बदामशिरा

 बघ ना माझ्यात मी न उरे


आनंदाने राहू आंनदाने वागू

संसारात ऐकमेकांस प्रेम देवू

जन्मोजन्मीची वचने घेवून

परमेश्वर चरणी लीन होवू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance