ऐक बळीराजाची हाक
ऐक बळीराजाची हाक
नाही पीकविमा यंदा
किती काढावेत कर्ज
जीव गेला दमुनिया
रोज करूनिया अर्ज.....!!
नाही शेतमाला भाव
गेली कंबर मोडून
ऐक शासना गाऱ्हाणं
दोन्ही हात रे जोडून....!!
झाले सावकारी कर्ज
नको झाला आता जीव
शेतकरी पोशिंदा तो
कशी नाही येत कीव.....!!
लाईनबील ते अमाप
आता कशानं भरावं
पोरंबाळं जगवावं
की उपाशीच मरावं......!!
साऱ्या जगाचा पोशिंदा
ऐक बळीराजाची हाक
नको करू हेटाळणी
नको रोजचाच धाक.....!!
