अहिंसा (सहाक्षरी)
अहिंसा (सहाक्षरी)
बुद्धांची अहिंसा
जगतात भारी
बौध्द राष्ट्र असे
शान भारताची...
पाण्यासाठी कशा
शस्त्र हाती घ्यावी
वाहते शांतेत
स्थीर ती रोहिणी...
अंगुलीमालास
उपदेश करी
शस्त्र असे त्याने
वाहिले चरणी...
जंबुद्विप असे
होते तेव्हा सुखी
शेजारी देशात
शांतता नांदवी...
परदेशी लोक
पाही जेव्हा लेणी
बुद्धांची अहिंसा
झुकती चरणी...
