STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Romance Tragedy Fantasy

3  

Bhagyashri Chavan Patil

Romance Tragedy Fantasy

अचानक सगळं काही थांबलं

अचानक सगळं काही थांबलं

1 min
224

अचानक सगळं काही थांबलं

परत पहिल्या सारखं सगळं सुरू झालं..

वाटताना वाटत होतं किती चांगलं झालं..

पण कुठलं काय नेमक काहीतरी चुकलं..

अचानक सगळं काही थांबलं...


ओळख ही तितकी नाही तरी एकट वाटलं..

सवय ही तितकी नाही पण मन फार रडलं..

साथ चार दिवसांची ओळखायला कोण चुकलं..

अचानक सगळं काही थांबलं..


चूक कोणाची याच उत्तर कोणीतरी देईल अस वाटलं..

आपलं आपलं होतं म्हणुन कदाचित ते निघून गेलं..

परीक्षा होती जणु पास की नापास काहीच नाही कळलं..

अचानक सगळं काही थांबलं..


इतकं अस काय होतं त्या दिवसात की मन इतकं झुरलं..

आजूबाजूला अनेक जण असताना मन परत तिथेच का गेलं..

आताची पोकळी मनाला घट्ट करून बसली सगळं निघून गेलं..

अचानक सगळं काही थांबलं..


परत नवीन दिवस आणि नव्या आठवणींनी मन भरून आलं..

कारण जे गेलं ते माझं असं कधीच न्हवत हे आज मनापासून पटलं..

जसं अचानक आलं तस परत पहिल्या आठवणीत मला एकटं सोडलं..

अचानक सगळं काही थांबलं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance