अबोली
अबोली
सखे तू बोलत रहा
कारण तुझे दोन डोळे छे!
दोन दर्पणच बोलत आहेत
एक आहे माझी छाया
दुसरी तुझी पडछाया
तुझ्या गालावरती
ओसंडणारा चांदणं
पिऊन घेतोय मी
अधिऱ्या डोळ्यांनी
शब्दांची गरजच नाही इथं
सारा काही भावनांचा कल्लोळ
अबोल तुझ्या मुग्धतेत
माझ्या जीवनाच्या सार्या
आशा आकांक्षा फुलल्या
फक्त तुझ्याच बाहुपाशात
जीवनाची सांगता
तुला कवेत घेताना
जीवनात रम्यता
तुला कवेत घेताना
सारे विश्व कवेत आले
तुझ्या रेशमी बाहुपाशात
सारे दुःख निमाले

