अबोल प्रीत
अबोल प्रीत
सख्यांनो मी हि प्रेम केल होत
पण ह्रदय जोडण्याअगोदरच
माझ ह्रदय तुटलं होत
मीही कळी बनुन उमलु लागले
पण उमलन्याअगोदरच कोमजून गेले
माझ्याही चेह-यावर प्रेमाच तेज आलं
पण प्रेम व्यक्त होण्याअगोदरच
ते निस्तेज झाल
कारण...कारण त्याला एकच होत
जेव्हा ह्रदयातल्या भावना त्याच्या ओठावर आल्या
तेव्हा माझा हात,अलगद माझ्या कानावर पडला
आणि जेव्हा माझ्या संयमाचा बांध फुटला
मी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला
तेव्हा तो समोर कधीच नाहि दिसला
दोष देवू कोणाला, या नियतीला
का माझ्या अबोल भावनांना...

