STORYMIRROR

jaya munde

Classics

3  

jaya munde

Classics

अभंग

अभंग

1 min
363

सखा माझा एक! पांडूरंग हरी

दुःख दूर करी! भगवंत!! १!!


जीवन सुंदर!नामात रमता

सौख्याची समता! सर्वकाळ!! २!!


माझा सखा हरी!अंतरी मोक्षदा

टळते विपदा! क्षणोक्षणी!! ३!!


त्याचा लळा लागे!दर्शना जाईन

नेत्राने पाहीन!सुस्वरूप!! ४!!


एकादशी येता!दिंडीत नाचते

बेभान वाहते!भक्तीगंगा!! ५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics