STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Inspirational

3  

Ganesh G Shivlad

Inspirational

आयुष्याची सुखवाट

आयुष्याची सुखवाट

1 min
354

एकटाच आहे आला,

जाणार ही तू एकटा..!

पायवाट आयुष्याची,

चालणार तू एकटा..!


आयुष्याची पायवाट,

नाही मुळी खडतर..!

हवा रे आत्मविश्वास,

कापण्यासाठी अंतर..!


मागू नको आयुष्याला,

सुखवाट स्वतःसाठी..!

तुला मिळेल बहुत,

वाट तू दुसऱ्यासाठी..!


निसटतो हातातून,

वर्तमान जशी रेती..!

भूत सोड मागे आता,

भविष्याला बांध हाती..!


चाल भविष्याच्या दिशा,

बोलावती त्या रे तुला..!

तुझे उज्ज्वल क्षितिज,

खुणावते आहे तुला..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational