STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
349



जगण्याकरीता आयुष्यात

त्याग तपस्या करावी लागते

समाधानाचं बी रूजवूनी

आनंदी आयुष्य फुलवावे लागते...

माझा मीपणाचा अभिमान

कधीही कामाला येत नाही

श्रेयाला कितीही जपले तरी

सोबतिला काही तो राहात नाही...!!

आयुष्य ही सुंदर भेट

त्याला सत्कर्मात फुलवायचे

दुसऱ्याच्या मेहनतीचे फळ

त्यालाच खाऊ द्यायचे....!!

आयुष्यावर बोलायचे काही

या सप्तरंगात न्हायचे रोज

दुनिया आहे एक रंगमंच

मिळूनमिसळून जगायचे आज..!!

जन्म घेतो जन्मदिवस मनवितो

तारुण्य येतसे वेर्धक्य येतोय

आणि आपण आपले आयुष्य

हमखास जगायचेच विसरतोय...!!

खुप जगा पण स्वस्थ रहा

सुखाच्या जगाला सोडू नका

काय मिळवलय काय गमवलय

कारण शोधण्या आयुष्य गमवू नका...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational