STORYMIRROR

Mina Shelke

Tragedy

4  

Mina Shelke

Tragedy

आयुष्य तिचे

आयुष्य तिचे

1 min
149

कोंडून मनाला...

जपले नात्याला 

बांधून काळीज 

वाहिले जात्याला...


स्वतःच्या स्वप्नांना

ठोकून खुंट्याला 

साहिले ओझ्यांना ...

आले जे वाट्याला ...


सुपातलं दाणी

मुखातली वाणी

झाली एकरूप

जीवन कहाणी...


तळीवर तळी

भरडले मन...

सत्वशील तन

उमटले व्रण...


जात्याच्या आरीने

सांभाळून तोल

गृहीत नात्याने

चुकविले मोल ...


भरडला जीव

मुठीत घेऊन

झिजवली काया

दगड होवून


पाळूला साचले

ढिगभर पीठ ...

अळणी निघाले

कष्टातून मीठ...


बाईचा जन्मचं

झिजण्यात गेला

शेवटाला मात्र...

अडगळ झाला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy