STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Abstract Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Abstract Tragedy Action

आयुष्य जगताना...

आयुष्य जगताना...

1 min
351

आयुष्य जगताना मरण सामोरे आले 

आणि मग लक्षात आलं की जगणे राहून गेले


आपली म्हणणारीच माणसं जेव्हा परिस्थिती

पाहून दोन हात ठेवून वागू लागली

तेव्हा कळालं "अनकंडिशनल लव्ह"असं

खरंच काही नसतं.


पैसा असताना एक ट्रीटमेंट आणि पैसा नसताना एक ट्रीटमेंट मिळू लागली

तेव्हा कळालं पैसा सर्वस्व नसला तरी पैशामुळे

सर्वकाही असतं.


हे मात्र अगदी खरं जोवर शीत तोवर भूत

परिस्थितीवर माझ्या अनेकजण हसले

बर झालं इची आता जिरली.


आपल्या माणसांबरोबर जसा वेळ कसा जातो ते कळत नाही ना,

तसंच वेळेबरोबर आपली माणसं कोणती तेही कळालं.


शाश्वत असं काहीचं नसत तरी ही 

हे माणसाच मन प्रत्येक गोष्टीसाठी झुरत

दिवस-रात्र काम करून शरीर थकत


शेवटी मात्र.....

आयुष्य जगताना जगणं राहून जात

आणि मरण समोर येऊन उभं ठाकतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract