STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

आयुष्य हे न उलगडलेले कोडे

आयुष्य हे न उलगडलेले कोडे

1 min
309

आयुष्य हे न उलगडलेले कोडे

त्याला समजले तितके थोडे


कधी आनंद कधी दुःख

कधी वाटेवरती फुल कधी काटे

काट्यांना स्पर्शून फुल मिळे

आयुष्य हे न उलगडलेले कोडे


कधी हसु कधी आसू

कधी ऊन कधी सावली

उन्हातुनच सावलीची किंमत कळे

आयुष्य हे न उलगडलेले कोडे


कधी उत्साह कधी नैराश्य

कधी खाच कधी खडगे

खाचखडग्यातूनच वाट मिळे

आयुष्य हे न उलगडलेले कोडे


आयुष्य हे न उलगडलेले कोडे

त्याला समजले तितके थोडे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational