आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक रंगमंच
रंगमंच चे आम्ही कलाकार
दाखवतो कलाकारी अपार
अभिनय आयुष्याचा करतो
बदलून आपले किरदार
प्रत्येक अभिनेता मंचावर
करतो अभिनय दमदार
तेव्हा कुठं प्रेक्षकांच्या हृदयी
जीवंत असतो तो किरदार
आयुष्याच्या या रंगमंचावर
प्रत्येकाने व्हावे खबरदार
पावलोपावली येत असते
दुःख वेदनेचा अधीक भार
आयुष्याच्या ह्या रंगमंचावर
किती अभिनय बदलतात
ज्याला आयुष्य कळालं खरंच
तेच खरे टीकून राहतात
