आवड...
आवड...
मला आवडत नाही
म्हणत म्हणत केव्हा
मी तुला आवडायला
लागलो तुलाच कळलं नाही
प्रेमाच्या माझ्या गावात
कळूनही मुद्दाम पडलेलं
तुझं पहिलं पाऊल... पुन्हा
माघारी कधी वळलंच नाही
मला आवडत नाही
अशा गोष्टींची यादीच
दाखविणारी तू.. कधी
माझ्या आवडीला सरावलीस
बाहेरचं पाणीही न
पिणारी तू मला आवडते
म्हणून कॉफी पिऊन माझ्या
अन तिच्या अधीन झालीस
रोज सायंकाळी गुलमोहोराच्या
खाली वाट पाहतो एकटाच..
तू मात्र तिथे कुठेच नसतेस
हे मात्र मला...
आवडत नाही...