STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Romance

4  

SURYAKANT MAJALKAR

Romance

आतुर प्रेयसी

आतुर प्रेयसी

1 min
264

सुगंध सुमनांचे

सुबंधन जीवांचे

चांदणे सोबतीचे

बरसते प्रणयांवरी ||१||


आज प्राशुनीं घे

मम मन अर्पिताचें

दवडु नकोस संधी

चित स्थिर व्हायचे ||२||


कोणास खबर नाही

मम आगमनाचे

अलगद ओढुन घे

हे सत्य समयाचे ||३||


रात अपुरी पडेल

मन स्वार व्हायचे 

थकतील गात्रे अवघी

हे आता न व्हायचे ||४||


काय सांगू प्रिया

येणे माझे अगत्याचे

परतुनी स्वस्थानी जाणे

हे मत तुझ्या मर्जीचे ||५||



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance