आठवणीतील जुनी शाळा
आठवणीतील जुनी शाळा
आमची "जुनी शाळा" खुप छान होती
वारसा देणारी आम्हाला प्रिय होती ॥धृ॥
आम्हाला घडवणारी संस्कारशील होती
मनातील कुपित बसलेली
आठवणीतील शाळा महान होती ॥१॥
आम्हाला आवडायचे खेळ हे मैदानी क्रिकेट, लगोरी,
गोट्या सारेजण खेळ खेळायचे मर्दानी ॥२॥
घंटेचा नाद, प्रार्थना वेळेवर व्हायची
राष्ट्रगीताला सारेजण आदराने स्तब्ध
उभे राहायची ॥३॥
सुर्याेदय-सुर्यास्ताने सार्यांना वेळ समजायची
"शाळा सुटली,पाटी फुटली" हे गाणे म्हणत पोरं घरी यायची ॥४॥
झेंडा वंदनाला गावातून निघायची फेरी
झेंड्याला सलामी दिल्यावर मिळे चाॅकलेट, लेमन गोळी ॥५॥
आमची "जुनी शाळा" असेल छोटी येथे घडले मैल्यवान हिरे-मोती
जुन्या शाळेतील आठवणीनी हृदयात खूप झाली हो दाटी ॥६॥