फक्त आठवण रहाते
फक्त आठवण रहाते
मूठ घट्ट असली तरी
वाळू सुटत जाते,
मंतरलेल्या दिवसांची
फक्त आठवण रहाते
भरलेल्या ओंजळीमधून
पाणी गळून जाते,
हाताच्या ओलाव्यात
फक्त ओली आठवण रहाते
टवटवीत गुलाबाची
शान निघून जाते,
वहीत सुकलेल्या गुलाबाची
फक्त आठवण रहाते
दरवळणाऱ्या कुपी मधले
अत्तर सांडुन जाते,
वेडावणाऱ्या सुवासाची
फक्त आठवण रहाते
रंग सोडून फुलपाखरू
अलगद उडून जाते,
उरलेल्या रंगाची
फक्त आठवण रहाते
आठवणींचे असंख्य काजवे
मनात लुकलुकत राहतात,
घडून गेलेल्या क्षणांच्या
फक्त आठवणी राहतात

