दॅट व्हॅलेंन्टाईन डे..
दॅट व्हॅलेंन्टाईन डे..
(काल्पनिक आहे पण कोणाच्या ही भावना दुखावण्याचा हेतू नाही... सुचलं म्हणून लिहिले...
अभिवादन वीर सैनिकांना....
हो, तो व्हॅलेन्टाईन डे च होता...
१४ फेब्रुवारी २०१९ ची सकाळ ची वेळ,
नियती ने खेळला हा खेळ....
हातात घेऊन तुझा फोटो फ्रेम,
करायचे होते खुप प्रेम...
घेतलेले गुलाब एक लाल,..
शुभेच्छा साठी जवळ केला,
तुझा फोटोतील गाल...
इतक्यात च, आला एक कॉल...
आणी, मी उचलून I love you बोलणार,
तोच....
Sorry Mam!......फॉर.....
हो,
माझा व्हॅलेन्टाईन शहीद झाल्याची होती ती खबर...
१४फेब्रुवारी २०१९ ला माझे मॅजर प्रीत झाले अमर...
I really missed you dear...
