STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance

3  

sarika k Aiwale

Romance

आठवणींचा गुंता

आठवणींचा गुंता

1 min
263

मनातल्या आठवणींचा गुंता

सांग सोबतीने कसा मी चालू

छल हा भावनेचा असा ही

सांग किती काळ असा मी साहू

आपलेसे करून दुरावली

जी सावली या मनातली

सांग कुठे शोधु आजही

छबी तुझ्या या मनातली

कितिदा व्यक्त जाहले

भाव माझ्या ही मनातले

व्यक्त काळजीत हरवते

अव्यक्त तुझ्यामाझ्यातले

का उगा सांगून संपायची

भिती उरात या दाटली

क्षणात मनातल्या गोष्टीसवे

व्यथा कवितेत ही मांड़ली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance