आठवणी
आठवणी
अशा का असतात या आठवणी
सुखद गारव्याचा ओलावा जपणाऱ्या
साठवल्या ओंजळीत कितीही
तरी अलगद निसटुन जाणाऱ्या रित्या या ओंजळीत
सुखद गारव्याचा स्पर्श जपणाऱ्या
अशा का असतात या आठवणी
कधी कडाडणार्या विजांचे
शल्य टोचंणाऱ्या
कधी विरहाच्या आठवणीत अश्रुसारख्या बोचनाऱ्या
अश्रू वाहून गेले तरी
अबोल दुःख सोडणाऱ्या
अशा जगण्याचे साथीदार असतात या आठवणी
