STORYMIRROR

Jayesh Madhav

Abstract

3  

Jayesh Madhav

Abstract

आठवणी

आठवणी

1 min
292

शाळेत आम्ही जायचो

शेताच्या बांधावरून..

दंगा मस्ती करीत

कधी डांबरी रस्त्यावरून


ते दिवस होते सुगीचे..

आनंदात जगण्याचे

शाळेत शिकता शिकता

ईतर बरेच काही शिकण्याचे


मित्रांच्या संगतीत..

हुतूतू खेळताना

आनंदाचा कहर असे

पायात पाय घालताना


पावसात भिजताना..

भान नसे वह्या पुस्तकांचे

घरी धपाटे पडले तरी

सोडले नाही भिजायचे


गेले ते दिवस..

राहील्यात फक्त आठवणी

मनातल्या एका कप्प्यात

दडून आहेत साठवणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract