आठवणी
आठवणी
सोडून निघून गेलास तू
उरल्या फक्त आठवणी
तुझ्या माझ्या भेटीच्या
करते मनात साठवनी
बाण सोडूनी शिकारी
घायाळ करतो हरिणी
मज झाहले तैसे रे
का केली ऐसी करणी
ह्रुदयात आठवणीच्या
उसळतेय रोज लाटा
वाहणार तो कुठे रे
डोळ्यास मागतो वाटा
विचारतात मज रे
झुमके आणि कंगना
त्यास ओढ तुझ मीठी
भेटणार कधी सजना