आठवण
आठवण
माझ्या आठवणींना,
तुझ्या सोबतीची जोड आहे ,
तू सोबत असेल तर
प्रत्येक आठवण गोड आहे.
तुझी आठवण येण्यासाठी
काळ वेळ लागत नाही,
तू मात्र कुठे हरवतेस
हे मात्र मला उमगत नाही .
आवडली असेल जर तुला
तर तुही थोडी दाद द्यावी,
तुझ्यामुळेच लिहिली गेली आहे
म्हटल चला, कविमनाला थोडी वाट द्यावी.
शब्द सागरात उडी मारून
मी शब्द शोधतो आहे,
माझं मन व्यक्त करण्यासाठी
ह्या चारोळी लिहितो आहे.
रातराणीच्या फुलांनी
हि सांज बहरू दे,
तुझ्या आठवणींच्या सुगंधाने
माझे मन दरवळू दे.
आज तुझ्यासाठी लिहिताना
शब्द अपुरे पडताहेत,
माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी
शब्दच ‘शब्द’ शोधाताहेत.
प्रत्येक क्षण आठवेल तुला
माझ्या सोबतीतला,
तुला आठवलेले क्षणही
लाजवेल त्या सुखाला.
