आठवण
आठवण
तळघरातली आठवण आज
मनाच्या उंबरयावर येऊन बसली
फार दिवसांनी आली थोङी रुसुनच म्हणाली तुम्हाला
काही माझी आठवण येत नाही कधी ङोळयात साठवुन ठेवु नये
असे मुक मुक राहु नये
नाही तर अश्रुंची वाहते नदी
आठवण आलीच कुणाची तर
होते नव्हते रागलोभ रुसवे ,फुगवे ,तुझं माझं सगळं विसरुन बोलुन घ्यावं
मनातल दुख हलक कराव
उंबरयावर बसलेली आठवणही मग
हलकी हलकी होत जाते
कधी पतंग होऊन
कधी फुलपाखरू होऊन
मनातल्या आकाशात,
क्षितिजापलिकङे निघते.

