आठवण
आठवण
आलोय असा लांब, सोडून पिल्या तुला
काय सांगू करमत, नाही आता मला
तू पाहिजे आहे, सतत मला सोबत
प्रवास नशिबी आला, सारी वेळेची नौबत
कशी हसते माझ्याकडे पाहून, बघतो असा तुला
उचलून घेऊन बाबा आता, फिरवा आस मला
खेळा माझ्या सोबत, बसा माझ्या बाजूला
सगळा वेळ तूझाच आहे, सांगा माझ्या काजूला
कायम तूझ्या सोबतीच्या, मनात आहे आठवण
प्रत्येक तो क्षण तूझ्या सोबतचा, आहे खास साठवण

