STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

2  

Umakant Kale

Tragedy

आत्महत्या

आत्महत्या

1 min
2.7K


भयानक परिस्थिती आज,कमी होतो श्वास

जगण्याची नाही उमेद, रोज हरतो मग प्राण

आस न दिसे माणसाला, अंधारी डोळ्याला

बुद्धी आकुंचली, जीवावर मग येतो ताण

ओझी वाढे कर्जाची, दमछाक होई कुटुंबाची

ना दिसे आशा जगण्याची, जळतो हा प्राण

वेदनांच्या सागरात मोह सुटेना हो मजपरी

जगणे बाकी होते अजून, पण तळमळी प्राण

धोरणावर धोरणे, मेल्यावर देई आधार

जगण्या ऐवजी हो येथे जो-तो देतो प्राण

सत्र मुलाखती चे होती हो सुरू

प्रसिद्धी चा होतो बाजर, दु:खाची नाही जाण

आत्महत्या करुन नाही सुटले हो प्रश्न ?

द्या मदतीला हात, जगवू या आपलचं जगणं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy