आत्मभान
आत्मभान
प्रतिकृतींची होळी कशाला करता,
खलप्रवृत्तींची होळी करा.
माणसाला माणूस मानणार
अशी कास मनी धरा!
होळीत लाह्या पडण्यापेक्षा
भुकेल्या मुखी घास पडो.
दंगेधोपे करणाऱ्या
या अधमांचा नाश घडो!
उपभोगांमागे धावताना
माणुसकीची राख होते.
पैशांमागे पळताना स्त्रीजन्माची
ममतेची आस राहून जात्ये!
होळीच्या पेटलेल्या धगीत,
'मी' पणाचा अधःपात होऊ द्या.
आपल्या मनाला देवत्वाची
सोन्याची झळाळी येऊ द्या!
