आत्मा
आत्मा
एकदा विपरीत घडलं
दूत आला मृत्यू चा अन्
साक्षात उभा समोर ठाकला
आत्म्याला माझ्या शरीरातून
काढून घेऊन जाऊ लागला
मी झाले आश्चर्यचकित
असं कसं आताच आलास
घेऊन जायला दूरवर अनंतात
थांब जरा थोडी वर्ष आता नको नेऊ
मुल माझी आहेत लहान थोडी
माझ्या स्वतःकडून अपेक्षाच खूप
आताच शिकले जगण्यास भरपूर
मी नाही तयार यायला तुझ्या सवे
शरीर माझा आत्मा दुताकडून खेचे
आत्मा ही नकारू लागला नाही येणार
शरीर आत्मा करू लागले संघर्ष
नाहीच येणार आता तुझ्या बरोबर
दूत माझा आत्मा सोडून गेला
