STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Inspirational

4  

प्रतिभा बोबे

Inspirational

आता तरी बंद करा

आता तरी बंद करा

1 min
204

आज पुन्हा तेच घडले 

माणुसकी इथे ओशाळली

दोन वर्षांची गोड चिमुरडी 

अंधश्रद्धेपोटी बळी पडली 


गुप्तधनाच्या विचित्र हव्यासापोटी

ढोंगी मांत्रिक हैवान हो बनला

आयतं घबाड मिळवण्याचा नाद 

एक निष्पाप जीव मात्र गेला 


आजही लोक अंधश्रद्धेपोटी

तारतम्य सोडून वागत आहेत

कष्ट करुन सुखात जगण्यापेक्षा

बळी देऊन पोळी मिळवण्यामागे लागले आहेत 


बळी घेणाऱ्या या नराधमांना 

जागीच पकडून ठेचले पाहिजे

समाजानेही जागृत होऊन या 

वाईट प्रवृत्तीविरुद्ध पेटून उठले पाहिजे


नरबळी देऊन गुप्तधन मिळवणे

यातच आहे जर समाधान या मुर्खांचे 

याचेच बळी दिले तर होईल ना? 

कल्याण अवघ्या समाज अन् मानवजातीचे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational