आता थोडं हसावं म्हणतो मी.
आता थोडं हसावं म्हणतो मी.
*आता थोडं हसावं म्हणतो मी.*
खुप झालं रडत रडत जगणं,
आता थोडंसं हसावं म्हणतो मी.
अनेकांना उघड्या नजरेनं पाहिलं,
कुणाच्या तरी नजरेत दिसावं म्हणतो मी.//1//
अनेकांना रुसतांना पाहिलं आहे,
आता थोडंसं रुसावं म्हणतो मी,
सुखाच्या सावलीत विसावलो आजवर,
दुःखाच्या उन्हात थोडंसं बसावं म्हणतो मी.//2//
माझ्या आठवणीत भिजले जे पण,
आठवणीत त्यांच्या भिजावं म्हणतो मी,
सुख शोधण्या भरकटलो राणावनात,
सुखाच्या सावलीत निजावं म्हणतो मी.//3//
झोपेत स्वप्नं पाहिले आजवर,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहावं म्हणतो मी.
आयुष्याचे क्षण केवळ अनुभवले,
कवितेत त्यांना लिहावं म्हणतो मी.//4//
रडत रडत जगणं आहे व्यर्थ,
सत्य हे आता समजावं म्हणतो मी,
म्हणूनच आता ठरवून मनात,
हसत हसत जगावं म्हणतो मी
हसत हसत जगावं म्हणतो मी //5//
