बालपणीची दिवाळी
बालपणीची दिवाळी
खरंच बालपणीची दिवाळी,
होती किती गोड,
येता समीप दसरा दिवाळी,
लागे मामाच्या गावाची ओढ ॥१॥
राहते आज डोळ्यासमोर उभी,
सकाळची अंघोळ ती खाटेवरची,
होईल का पल्लवीत पुन्हा,
पालवी ती बालपणाच्या वाटेवरची ॥२॥
होई वर्षातून एकदा,
मामा मामीची ती भेट,
माया ममता प्रेम त्यांचे,
गाठे काळजाचा देठ ॥३॥
सुरसुऱ्या त्या उडवत बहिणी,
करीत भावाचं औक्षण,
सुख दुःख अन संकटकाळी,
होवो माझ्या भावाचं रक्षण ॥४॥
