आई मज पाहूनी...
आई मज पाहूनी...
गर्भातील मुलीची आईला आर्त हाक......
आई मज पाहुनी.......
आई मज पाहुनी,
करतेस का डोळेझाक,
मारुनी मज टाकुनी
करतेस का हे पाप //१//
येतील सण आई
दसरा आणि दिवाळी
पंचारती घेऊनी गं
दादास मी ओवाळी //२//
देणार नाही दुःख,
आई कधी तुला गं
तू जग पाहिलेस,
पाहू दे जग मला गं//३//
मलाही वाटतं यावं,
बिलगून बाबाच्या जवळी,
तोडू नको गं मला,
मी खूप आहे कोवळी//४//
तू ही आहेस नारी,
मी ही गं नारी आहे
तुझीच असून मुलगी,
का मारण्याची तयारी आहे//५//
ताईस कुणी नाही,
करण्यास आई मदत
करीन आई काम,
पडेल जे पण हातात//६//
हुंडाच लागतो म्हणून,
का मारतेस तू मला
पोटच्या मुलीला मारते
कसे आई म्हणू ग तुला//७//
