अमर करूया प्रेमाला
अमर करूया प्रेमाला
1 min
135
हृदयात हृदय गुंतले,
श्वासात आता गुंतू दे श्वास,
असह्य झाले एकट्याने चालणे,
करू आता सोबत जीवनप्रवास. !!१!!
आले आजवर ओठावर,
फक्त तुझेच नाव सख्या रे,
भिडावे आता ओठास ओठ,
करण्या शांत तनामनाचे निखारे. !!२!!
आपल्या प्रेमाचेच मधुर संगीत,
सदैव मनी गुणगुणले मी,
विषारी नजरांनी लोकांच्या,
सख्या रे आता शिणले मी. !!३!!
घेऊन शपथ प्रेमदेवतेची
घालावी मज आता पुष्पमाला
जातीपातीच्या तोडून भिंती,
अमर करूया प्रेमाला. !!४!!
