ऋतू हा यौवनाचा
ऋतू हा यौवनाचा
सुवर्ण ह्या क्षणांनी,
दूर केला दुरावा,
तू यावं समीप इतके कि,
दोघांत आपल्या वारा हि न फिरावा. //1//
कित्येक दिवसांनी पाहून तुज,
नयन माझे संतुष्ट झाले,
न चुंबिताच तू मजला सख्या,
तन मन माझे रोमांचित झाले. //2//
घेता तू अलगद मिठीत मज,
स्वतःला मी का अशी हरवून बसले,
श्वासात तुझ्या अडकला माझा श्वास,
अन नयनात तुझ्या अवघे विश्व दिसले. //3//
एका जागी थांबेना नजर,
आरसाही मला आता लाजवतो,
आठवणीत तुझ्या रे सजना,
फोटो तुझा नेहमीच मला भिजवतो //4//
बांधावं तू आता डोरलं गळी,
ऋतू सरून जाण्यापूर्वी हा यौवनाचा,
हकदार आहेस तूच सजना,
माझ्या उभरत्या ह्या लावण्याचा //5//

