STORYMIRROR

Rahul Ingole

Others

4  

Rahul Ingole

Others

कुटुंब

कुटुंब

1 min
206

कुटुंब जसे की

असे एक झाड ,

पानं फूलं मुळे फांद्या 

तयात समाविष्ट  //१//


फांद्या जणू काही 

आई वडिलांची बाळं 

नातवंड गोंडस

जणू सुंदर ती फुलं  //२//


माय बापाची ती जागा 

जणू मुळाच्याच जागी,

पानं-फुलं अन फांद्यांचा

वाहे भार डोई  //३//


कष्ट साहूनी असंख्य 

मुळा परी मायबाप 

पानं-फुलं फांद्या 

तेव्हा होती पल्लवित  //४//


झाडाच्या त्या फांद्या 

होवो कितीही विस्तीर्ण 

परी कधी मुळांना

नाही चालणार विसरून। //५//


Rate this content
Log in