STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy Others

4  

Rajesh Sabale

Tragedy Others

आता धडा मात्र शिकवायचा

आता धडा मात्र शिकवायचा

1 min
152

रस्ता गावातला की शहरातला, हा विचार आम्ही का करायाचा,

अन राजकारणी मंडळींनी, फ़क्त नुसता भ्रष्टाचारच करायचा।।

निवडणुकीत हात जोडून म्हणत्यात, तुम्ही आमचं मायबाप।

सेवा करायची संधी दया, मग सारं करू की कर्ज माफ।।


लई झाली लबाडी तुमची, आता आलय आमच्या ध्यानात।

घोडा मैदान जवळ आलंय, तवा राहू द्या फक्त ध्यानात।।

सबका विकास करू म्हणत, आपलाच खिसा भरायचा।

अन निवडणूक झाल्यावर, काना डोळा करायचा।।


भ्रष्ट आणि चोर लबाड सारे, आणतो म्हणे देशात।

अन नोट बंदी करून म्हणाले, येतील सारे मैदानात।।

मल्ल्या, मोदी, दाऊद भाऊ, सारे जिथल्या तिथं।

अन रोज होतो खून, बलात्कार, आज आमच्या इथं।।


कायदा आणि समित्या नेमून नसता, देखावा करायचा।

आस लावून सवलतीची, जीव गरीब माणसांचा घ्यायचा।।

सामान्य लोकांनी आता मात्र, एकच विचार करायचा।।

सरकार कोणाचंही असो, त्यांना धडा मात्र शिकवायचा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy