आता असे करणार नाही
आता असे करणार नाही
आता कधीही मी तुला टोमणे मारणार नाही
आता कधीही तू माझ्याकडून हरणार नाही
तुझी धडपड मला आता कळली आहे
का वाटते तुला कधीही कळणार नाही
तुला छळणारे माझे तिरके शब्द
आता कधीही तुझ्याकडे वळणार नाही
इतके का घेतलेस माझ्या बोलण्याचे दुखणे
आता कधीही तुला बोलणार नाही
इतके का घाबरतीस तू मला
आता कधीही दुखवणार नाही
तू तुझे घर माझ्यासाठी सोडून आलीस
हे कधीही विसरणार नाही
तू कितीही चुका केल्यातरी
मी आता रागावणार नाही
तुझ्या घरच्याकडून मला काही नको
मी तुला आता हिणवणार नाही
संसाराचा गाडा तू बरोबरीने ओढलास
स्त्री म्हणून कधीही कमी लेखणार नाही
का म्हणत होतेस तू मी घरात असेल
तोपर्यंत माझी किंमत कळणार नाही
का माझ्यावर रुसुन गेलीस तू तिथे
जिथुन कधीही कोणी परतणार नाही
