स्वतःसाठी
स्वतःसाठी


जाग माणसा जाग असा किती दिवस रडणार
जग बदलत आहे आता तू कधी बदलणार
घरदार सारे, गाव जमिनी सोडून आपल्या
कबिला घेऊन तू असा किती दिवस फिरणार
गुलामीची लागली तुला सवय आता
तुझा पगारी रूबाब किती दिवस मिरवणार
शिफ्टच्या नादाने वेड्या तुझे आयुष्य शिफ्ट झाले
नुसताच कामावरच राहिला तर स्वतःसाठी
आणि घरच्यासाठी तुझ्याकडे वेळ किती उरणार
जितके तुझे वेतन वाढणार, तितका तू मागे राहणार
आयुष्यभर वेड्या तू फक्त जाॅब पाहत राहणार
अनुभव तुझा वाढला की तुला लोक संपवणार
तुझ्यावर बोट ठेवून आपली चूक लपवणार
आयुष्य संपेल तुझे, पण समाधान नाही मिळणार
सांग वेड्या हे सारे तुला कधी कळणार
स्वतःसाठी तू आता कधी लढणार