आश्वस्थ आधार
आश्वस्थ आधार
कसं बोलावं कुणा आधार कुणास कुणाचा
नको सांगू मना बहर हा झाकोळलेला
क्षणात गुंतले जिवन आशेस आधार उदयाचा
क्षितिजास भासे आधार जणू आकाशीचा
मनास पिडा परी पावले थकली का वाटे
आधारास पुन्हा सागरी किनारा ते ही शोधे
नयनास सत्या परी स्वप्नांचा आधार भावे
श्वासाची ही डोरी जशी जिवनाचा आधार असे
शब्दाचा आधार मनास भावनेच्या कल्लोळ जरी
उध्वस्थ जिवाच्या ठायी किरणे प्रकाशाची आधार होई
