STORYMIRROR

nits Shelani

Inspirational

3  

nits Shelani

Inspirational

आशेची पणती..

आशेची पणती..

1 min
259

आशेची पणती

मनी मिणमिणती

म्हणून तर सबंध जग

महामारीशी लढती.

आशेची पणती

मनी मिणमिणती

मरण समोर दिसती

तरी इतरांचे जीव वाचवती.

आशेची पणती

मनी मिणमिणती

जरी निसर्गाच्या प्रकोपातही

माणुसकीचे दर्शन घडती.

आशेची पणती

मनी मिणमिणती

असो दुष्काळ स्थिती

बळीराजा करे माया मातीवरती.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational