STORYMIRROR

Vijay Sanap

Fantasy

3  

Vijay Sanap

Fantasy

आश्चर्य

आश्चर्य

1 min
2.9K


तिन माकडं जंगलात

येऊ म्हणाले फिरुन

झाला एक चमत्कार

वाघोबा दिसले दुरुन ।।


माकडं लागली घाबरु

एकाने दाखवली हिंमत

घाबरु नका म्हणाला

करु आपण त्याची गंमत ।।


आश्चर्य चकित होऊन

पाहिले मागे वळून

नको नको म्हणे दादा

जाऊ आपण पळून ।।


अद्भुत घडवूया चमत्कार

हिंमत नाही सोडायची

आज म्हणे धीर धरुन

खोड त्याची मोडायची ।।


जोर धरुन बोलू लागले

तिन्ही शेपटीची बांधू गाठ

एक जुटीने जाऊ पुढे

मान आपली करुन ताठ ।।


घडला उलटा चमत्कार

वाघ लागला मागे

धाव धाव धावत

पळत सुटले तिघेे ।।


झाली तिघांची फजिती

शेपटीत अडकून पडले

वाघोबा हसले पोट धरुन

माकडं धाय मोकलून रडले ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy