STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

आशा

आशा

1 min
205

आशेचे किरण 

दिसते मज काळोखात 

दुःखाच्या नगरीत 

मनाच्या भोवऱ्यात 


एकांताच्या वाटेवर 

कर्जाच्या ओझ्याने 

पाहताच चित्र देवा 

आशा वाढते मनाने 


धावता जीवन रुळावर 

गाडी कधी खचली 

आशा ठेव देवावर 

ठेच कधी बसली 


राहु सदा सुखमय 

हीच माझी आशा 

आलीच वेळ कधी 

नको देऊ निराशा 


झुंज देताना मृत्यूशी 

आस वाढते जगण्याची 

मृत्यूच्या काळास भेदून 

दिसेल आशा जीवनाची

***********************************


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational