STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

3  

Ashok Shivram Veer

Inspirational

आस पंढरीची

आस पंढरीची

1 min
239

आस लागली त्या पंढरीची,

भेट घेण्या या विठ्ठलाची


डोईला असा हा फेट्याचा पिळा,

ललाटी दिसे शोभूनी चंदनी टिळा


घेऊनी तुळस ती डोक्यावरी,

वाट चालती सदा हे वारकरी


नाद असा हा टाळ चिपळ्यांचा,

मुखी गजर असे तो विठू नामाचा


ना थकतो हा देह तयांचा,

करूनी जागर त्या किर्तनांचा


आस लागली त्या पंढरीची,

भेट घेण्या या विठ्ठलाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational