STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

4  

Meenakshi Kilawat

Tragedy

आर्त क्र्दन

आर्त क्र्दन

1 min
358

करून रस

: - *आर्त क्रंदन*


बोलते मी ऐक तुझ्या गर्भातला बाळ

करू नको तू आपूल्या बाळाचा घात 

इवलासा ग माझा जीव असे अती छोटा

अस्र शस्त्रांचा ग तू रचू नको घाट.....


पंचप्राण नियतिचा येवू दे घरात

तोडू नको ही वेल लागू दे फळ

तुझ्या प्रेमासाठी जीव तळपते आत

करू नको ग माझ्या जीवनासी खेळ.....


कशी खेळु आनंदात तुझ्या गर्भात 

तनमन घायल माझे रक्ताच्या पाटात

येते ऐकू का आई माझ आर्त क्रंदन

तुझ्या रक्तमासाचे मी कोमल पात.....


खुडू नकोस ग आई तू आपल्या

गर्भातली अजन्मी कच्ची कळी

तूच तर कोरली ही प्रेमाची लेणी

देवू नको तू आपल्या बाळाची बली....


येवू दे की तू मजला या धरेवर

स्वप्न माझे होऊ दे इथे साकार

नियतीशी करू नको असा तू खेळ

जगण्याचा मजशी तू दे अधिकार...


तू देवू नको काही धन ऐश्वर्य मजला

मी तुझ्या आंगनात खुप खेळीन

जन्मा आधी तू नको मारू मला

वंशाच्या दिव्यापेक्षा जास्त प्रेम करिन....


माय लेकीची ही माया उत्तूंग महान 

पाहू नको अशी छिन्नविछिन्न बाळ

तूला कोणी करे जबरदस्ती

जोड तू आपल्या कर्तव्याशी नाळ...


इवलासा ग माझा जीव असे अती छोटा

अस्र शस्त्रांचा ग तू रचू नको घाट.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy