STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

आरोप

आरोप

1 min
156

प्रेम छे प्रेम नाही तुजवर,

हा मजवर आरोप आहे ,

डोळे साक्षी आहेत ,

जो मजवर आरोप आहे ...

तुझा ठावठिकाणा कुठे ,

मला काय ठाऊक,

हा पण तुझ्याकडे वळणाऱ्या रस्त्यांचा ,

मजवर आरोप आहे ...

तु दिसताच धिर खचतो ,

उगाच मागेपुढे हूंदकळतो ,

तुझ्या अंगणातल्या सुगंधी मोगऱ्याचा ,

मजवर आरोप आहे ...

फरक पडत नाही मला,

तु सजून सवरून बाहेर पडतेस,

मन तुझा पाठलाग करे त्या काजळांचा ,

मजवर आरोप आहे ...

तु दिसली नाही की ,

उदासिनता उरात शिरते,

हर्ष दिसताच तु चेहर्‍यावर आनंदाचा ,

मजवर आरोप आहे ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance