आरोग्य
आरोग्य
ठेव हे शरीर निरोगी...
याच्या सारखी संपत्ती नाही दुसरी..
शरीरा दे चांगले भोजन..
नको त्याला बर्गर पिझ्झा चे सेवन..
भलतेच आमच्या जिभेचे चोचले..
पुरवता पुरवता सर्व थकले..
ग्रासले मग आजारपणाने..
दवाखान्यांनी मारू पाय फेर्या
औषधांचा तिटकाराच आला ..
जिभची चव कडवट झाली..
शरीर झाले नुसते जड..
जगण्याची आशा भारी मनाला..
पण शरीराकडे लक्षच नाही..
मनाला पोषण सात्विकते चे ..
शरीर ला पौष्टिक अन्नाचे..
जोड शरीराला कसरतीची..
नाही येणार मग आजारपण..
ठेव सुदृढ हे शरीर..
होईल निरोगी जीवन..
राहशील मग आनंदी..
त्यासाठी घे शरीराची काळजी ..
गरजा संपता संपत नाही..
पैसा कधीच पुरत नाही..
माणसाची हाव काय जात नाही..
आणि आयुष्यही पुन्हा मिळत नाही…
निरोगी शरीर हीच काय खरी संपत्ती।।
