माणसा
माणसा
आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात..
कोणी सुखात आनंद देत, तर कोण दुःखात साथ..
तर कोण आयुष्यभर मैत्री चा हात..
रक्ताची नाती ही परकी होतात..
तर अनोळखी मात्र कधी साथ देऊन जातात…
हा तर मानवी प्राणी ओ..बघता बघता रंग बदलूनी जातो..
जीव की प्राण म्हणूनी केसाने गळा दाबूनी जीव घेता..
अरे विश्वास, विश्वास म्हणून विश्वासघात कधी करूनी जातो..
लोकांच भलं , भलं म्हणूनी लुबाडुनी नेतो..
कलियुगी माणूस च माणसा चा घात करूनी जातो..
फसवे असतात माणसं,, फसवी असतात नाती..
जोडली जातात नुसती लोभ, आणि स्वार्थासाठी ..
मग दिसेल तुम्हां तेथे खोटी माया , फसवे प्रेम..
वाहतील रक्ताचे पुर ते ,खोटी शान राखण्यासाठी!!
कोण नसतं कुणाचं, हे तर वेळी च कळते..
नुसतं देखाव्याचा जग झालं..हो आज इथं एक
तर तिथं दोन ..
अरे आला होते रिकामे..जाणार रिकामे…
मग कशासाठी हा सगळा अट्टाहास..??
जन्म मरणाचा फेरा कधी कोणा न चुकला..
करशी चांगले कर्म ,घेशी पुण्य..
सार्थकी कर मनुष्य जन्म ..!!
