आई
आई
1 min
12K
माऊली माझी मायेची ऊन सावली.
दिली आयुष्याला साथ तीने पावलो पावली।
सोसले प्रसंगी अंगी अनेक घाव ..
पण कधी कळू ना दिला ठाव ।
कायम तिच्या स्पर्शाची ओढ लाघली..
तिच्या कुशीत जगन्याची गोडी वाढली।
पाहण्या मला ती नेहमी आतुरली..
आजारी असता कासावीस ती जाहली।
ठेच लागतं माझ्या पायी ..
वेदना होयी मात्र तिच्या हृदयी।
माझं कौतुक करता कधी नाही थकली..
माऊली माझी जणु मायेची ऊन सावली।
दुःख सारे नेहमी लपवी..
मुखावरती तरी स्मित हास्य दाखवी।
स्वतः राहील खुपदा उपाशी ..
पण तिचा जीव मात्र माझ्यापाशी ।
काळजी करता माझी कधी नाही थकली..
घरासाठी नेहमी झीजत राहिली।
माऊली माझी नुसती मायेची ऊन सावली।
दिली साथ तिने पावलो पावली।
आई साठी दिवस नाही।
आई विना दिवस नाही।।
